कणकवली स्टेट बँकेकडून एकाचे पैसे हातोहात केले लंपास

टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याचे कारण सांगत हातात दिले पैशांच्या आकाराचे कागदाचे बंडल

कणकवलीत भर दिवसा घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ

कणकवली स्टेट बँकेत हातचलाखि करत कसवण तळवडे येथील एका व्यक्तीचे 20 हजार रुपये हातोहात लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान ज्या व्यक्तीचे पैसे लंपास केले त्याच्या हातात नोटांच्या आकाराचे दुमडलेले कागद पिशवीमध्ये पॅक करून देत त्याला फसवण्यात आले. फसवणूक झाल्याची बाब उघडकिस येताच या प्रकाराने त्या व्यक्तीला एकच धक्का बसला. घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीने तात्काळ पोलिसात धाव घेतली. त्यानंतर कणकवली पोलीस उपीनिरीक्षक महेश शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार कसवन तळवडे येथील एक व्यक्ती 20 हजार रुपये भरण्यासाठी स्टेट बँक कणकवली शाखेत रांगेत उभी राहिली होती. यादरम्यान तिथे असलेल्या दोन पैकी एका तरुणांने तिथे बाहेर प्रॉब्लेम झाला आहे आमच्याकडील हे 1 लाख रुपये तुमच्या हातात ठेवा आणि अर्जंट तुमच्याकडील 20 हजार रुपये द्या. आधार कार्ड दाखवून 20 हजार रुपये भरायचे आहेत असे त्या दोघांपैकी एकाने या फसवणूक झालेल्या व्यक्तीला सांगितले. यावेळी या फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या हातात नोटांच्या आकाराचे बंडल असलेली पिशवी देत त्याला ही पिशवी तुमच्याजवळ ठेवा असे सांगण्यात आले. दरम्यान काही वेळात फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या ही बाब लक्षात येताच त्याने बाहेर जात पाहिले असता ते दोन्ही त्या ठिकाणी नव्हते. त्यानंतर त्यांनी 1 लाख म्हणून दिलेल्या पिशवीतील पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये नोटांच्या आकाराचे बंडल केलेले कागद आढळून आले. या प्रकाराने त्या फसवणूक झालेल्या व्यक्तीला एकच मोठा धक्का बसला. कणकवलीत भर दिवसा सिक्युरिटी असतानाही खुलेआम रित्या घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून स्टेट बँक कर्मचाऱ्यांकडून याप्रकरणी हा प्रकार बँक शाखेच्या बाहेर घडल्याचे सांगत हात झटकण्याचे प्रकार सुरू आहेत.

error: Content is protected !!