जुनी पेन्शन बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर २१ मार्च रोजी मोटारसायकल रॅली
सहभागी होण्याचे संघटनेचे आवाहन
कणकवली : राज्य सरकारी निम सरकारी मध्यवर्ती कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती राज्य शाखेच्या आदेशानुसार मंगळवार 21 मार्च 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संपकरी कर्मचारींची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून याचे नियोजन पुढीलप्रमाणे असेल. मंगळवार 21 मार्च 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संपकरी कर्मचारी मोटारसायकल रॅलीने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येतील. कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यातील कर्मचारी सकाळी 9.30 ते 10.00 या वेळात हाॅटेल RSN येथे एकत्र येतील व ठीक 10.30 वा सिंधुदुर्गगरीकडे येण्यासाठी मार्गस्थ होतील. मालवण तालुक्यातील कर्मचारी कट्टा येथे एकत्र सकाळी 9.30 ते 10.00 या वेळात येतील व ठीक 10.30 वा सिंधुदुर्गनगरीकडे येण्यासाठी मार्गस्थ होतील. कणकवली, देवगड,वैभववाडी तालुक्यातील सर्व कर्मचारी हाॅटेल विश्रांती वागदे कणकवली येथे सकाळी 9.30 ते 10.00 या वेळात एकत्र येतील व ठीक 10.30 वा सिंधुदुर्गनगरीकडे मार्गस्थ होतील. भव्य बाईक रॅलीची पोलिस विभाग व महामार्ग प्राधिकरण यांची परवानगी राज्य सरकारी निम सरकारी मध्यवर्ती कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती सिंधुदुर्ग घेणार आहेत. भव्य बाईक रॅलीत सहभागी कर्मचारी एका बाईक वर दोन कर्मचारी, दोघांकडेही हेल्मेट सक्तिचे, गाडीचे कागदपत्र आवश्यक असून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.प्रत्येक बाईक ला काळे झेंडे लावावेत व कर्मचारी यांनी डोक्यावर एकच मिशन जुनी पेन्शन ची पांढरी टोपी अगर फीत बांधणे आवश्यक आहे. कणकवली-कुडाळ येथून निघालेल्या मोटारसायकल सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे सकाळी ठिक 11.00 ते 11.15 यावेळात एकत्र येतील.ठीक 11.30 वा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन स्थळी जाण्यास मार्गस्थ होतील. कट्टा मालवण तालुक्यातील सर्व कर्मचारी ठीक 11.00 ते 11.15 यावेळात सिंधुदुर्ग सिव्हिल हाॅस्पिटल नाका येथे मोटारसायकल रॅलीने एकत्र येतील व ठीक 11.30 वा आंदोलनस्थळाकडे मार्गस्थ होतील. बाईक रॅलीतील सहभागी सर्व बाईक आंदोलन स्थळाच्या समोरील मैदानावर शिस्तबद्ध पध्दतीने पार्किंग करून ठेवाव्यात. सदर मोटारसायकल रॅली ही शिस्तबद्ध पध्टतीने व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊनच सर्वांनी यशस्वी करायची आहे असे आवाहन राजन कोरगावकर- अध्यक्ष सत्यवान माळवे – सरचिटणीस राज्य सरकारी निम सरकारी मध्यवर्ती कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
कणकवली / प्रतिनिधी