कणकवली शहरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल

तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही

कणकवली शहरात महापुरुष कॉम्प्लेक्स च्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. दरम्यान घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस मारुती जगताप यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र सदर तरुणाची ओळख पटली नसून या तरुणाची आत्महत्या घातपात की कसे याची उलट सुलट चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात नसावा अशी माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद देठे महेश शेडगे, दाजी सावंत पांडुरंग पांढरे भूषण सुतार आदि घटनास्थळी दाखल झाले आहे.

error: Content is protected !!