“जगात भारी आम्ही कोल्हापुरी” पुरस्कार ॲड. राजेंद्र रावराणे यांना

ज्येष्ठ सिने अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

व्यंकटेश्वरा प्रकाशन कोल्हापूर या संस्थेतर्फे देण्यात येणारा ” जगात भारी आम्ही कोल्हापूरी ” हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश वकील राजेंद्र रावराणे यांना प्रदान करण्यात आला. जेष्ठ सिने अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक महेश मांजरेकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक हे देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!