आचरा येथे वन विभागातर्फे माकड पकड मोहीम -ग्रामस्थांमधून समाधान

आचरा गावात माकडांचा उपद्रव वाढला आहे.शेती बागायती,नारळ फोफळी तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.लाल तोंडाच्या माकडांचा तर घरात घुसून केलेले जेवण फस्त करण्यापर्यंत मजल गेली होती.यामुळे ग्रामस्थांमधून माकड पकड मोहीम आचरे गावात राबविण्याची मागणी केली जात होती.याची दखल घेत सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी पुढाकार घेत आचरा ग्रामपंचायत तर्फे सावंतवाडी वनविभागाच्या सहकार्याने
आचरा गावात शनिवारी दिवसभर माकड पकड मोहीम राबविण्यात आली.यात भोसले वाडा परीसरातील माकडे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.या मोहिमेत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, तसेच अजित घाडी, गिरीश आपकर, श्रीपाद वायंगणकर, माधवराव भोसले,वनविभाग सावंतवाडी कुडाळ टिम वैभव अमृसकर,प्रसाद गावडे, दिवाकर बांबर्डेकर आदी सहभागी झाले होते.सदर मोहिमे बाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात असून अजून काही दिवस सदर मोहिम राबविण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे