अर्टिगा कार ने ओसरगाव मधील खुनाच्या तपासाला आली गती

सिंधुदुर्ग पोलिसांच्या कामगिरीमुळे मोठा गुन्हा उघडकीस

संशयित आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

24 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याचे दरम्यान कणकवली तालुक्यातील ओसरगांव कुलकर्णीनगर बाजुला असलेल्या कपांऊडमध्ये एका अज्ञात महिलेचा खुन करुन तो मृतदेह जाळला. त्याच दरम्यान त्या महिलेचा उजवा पाय ढोपरापासुन खाली शिल्लक असल्याबाबत फिर्यादी चंद्रहास उर्फ बबली आत्माराम राणे, वय-47 वर्षे, रा. ओसरगांव, पटेलवाडी, ता. कणकवली यांनी फिर्याद दिली होती त्यानुसार कणकवली पोलीस ठाणे गु.रजि. नं. 42/2025, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 138 हा गुन्हा 25 फेब्रुवारी रोजी दाखल झाला होता. या खुनाचा उलगडा झाल्यानंतर याबाबतची सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे माहिती दिली आहे त्यानुसार, संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अज्ञात मयत व अज्ञात आरोपीत यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी केलेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कणकवली पोलीस ठाणे यांची विशेष पथके तयार करुन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा व कर्नाटक राज्य तसेच सांगली, कोल्हापुर, सातारा, रत्नागिरी व रायगड येथील बेपत्ता महिलांची माहिती संकलित करण्यात येत होती. दरम्यान घटनास्थळी महत्वाचे पुरावे गोळा करणेकामी फॉरेन्सिक टिमने देखील भेट दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा गोपनिय तपास करीत असताना 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 07.00 ते रात्रौ 09.30 वाजण्याच्या मुदतीत एक सफेद रंगाची अर्टिगा कार उभी असल्याबाबत स्थानिक नागरीकांकडुन माहिती मिळाली होती. त्याआधारे सफेद रंगाची अर्टिगा गाडीचा CCTV च्या माध्यमातुन शोध घेत असताना गाडी क्रमांक MH-07-AB-0439 अशी निष्पन्न झाली. सदर गाडी व त्यावरील चालक याचे घटनेच्या कालावधीत वास्तव्याबाबत माहिती घेत असताना नमुद गाडीतील चालकाने मयत सुजिता सुभाष सोपटे, रा. किनळे, वरचीवाडी, ता. सावंतवाडी हिला सोबत घेवुन सावंतवाडी, आंबोली, आजरा कोल्हापुर पुन्हा सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कसाल, ओरोस व ओसरगांव येथे फिरत असल्याबाबत माहिती मिळुन आली. त्याअनुषंगाने संशयीत आरोपी वितोरीन रुजाय फर्नांडीस, रा. आरवली टाक, ता. वेंगुर्ला यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता आरोपी याने सदरचा गुन्हा हा पैशाच्या हव्यासापोटी केल्याचे सांगुन गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.सदरची कारवाई सौरभकुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषीकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व श्री. मारुती जगताप, सहायक पोलीस निरीक्षक श्री. मनोज अवरसमोल व भिमसेन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक- श्री. समिर भोसले, अनिल हडळ, सुधीर सावंत व रामचंद्र शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, गुरुनाथ कोयडे, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार- डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, संतोष सावंत, पांडुरंग पांढरे, सुभाष शिवगण, पोलीस शिपाई अमित तेली, प्रणाली झेमणे, रुपेश गुरव, मनोज गुरव, जयेश सरमळकर, स्वाती सावंत सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कणकवली पोलीस ठाणे यांनी एकत्रितरित्या केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!