चिंदर सडेवाडी येथे उद्या दशावतारी नाटक

चिंदर सडेवाडी येथील जत्रेचावड येथे शनिवार १मार्च रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा,सायंकाळी स्थानिक भजने,
रात्रौ 10वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर प्रस्तुत दशावतारी नाट्य प्रयोग वेडा चंदन सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बाबू हडकर आणि मंडळाकडून करण्यात आले आहे.