राष्ट्रीय विज्ञान दिनी आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये विक्रम.

भिंतीवरील घड्याळांच्या साहाय्याने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चित्रकृती.
कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साह साजरा झाला.
दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भरवलेल्या विज्ञान प्रदर्शनालाही भरघोस प्रतिसाद लाभला.
यानंतर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे आणि सौम्यास्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियलच्या पटांगणावर विक्रम घेण्यात आला, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र भिंतीवरच्या घड्याळांच्या मदतीने साकारण्यात आले .या सर्व कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर, सी.ई.ओ श्री.डी.पी तानावडे सर, श्री. मिलिंद मेस्त्री साहेब,मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई,तसेच श्री पंढरी जाधव सर,अरुण वळंजू सर ,PTA मेंबर्स श्री.अशोक कदम सर,PTA मेंबर्स सौ.चराठे मॅडम , तसेच श्री.रंजन चव्हाण ,कोकण नाऊ चे पत्रकार श्री.मयूर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांच्या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले ,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौमस्थ अकॅडमी चे श्री. योगेश सामंत सर आणि श्री. सिद्धेश साळसकर सर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. हेमंत पाटकर यांनी केले.