सकल मराठा प्राथमिक शिक्षकांतर्फे आयोजित वक्तृत्व , चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर

सकल मराठा समाज कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्राथमिक शिक्षकांतर्फे शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेत , चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे.
वक्तृत्व स्पर्धा ः पहिली ते चौथी गट – प्रथम दुर्वा मनीष कुबल,द्वितीय निधी संभाजी पाटील, तृतीय स्वरा लक्ष्मण कोकरे.
पाचवी ते सातवी गट – प्रथम आर्या राजेंद्र परब, द्वितीय पूजा प्रदीप परब, तृतीय विजय प्रकाश चव्हाण, आठवी ते दहावी गट – प्रथम रिया दीपक गावकर, द्वितीय प्रांजली राजेंद्र कोलते, तृतीय ओम सुशील परब ,आदी विजेते ठरले आहेत. तर चित्रकला स्पर्धा – इयत्ता पहिली ते पाचवी गट -मयुरेश तुळशीदास कुबल (एस.एम. हायस्कूल), द्वितीय भाग्येश गणेश सावंत (एस. एस. हायस्कूल), तृतीय आराध्य रुपेश म्हाडेश्वर (पोदार स्कूल). सहावी ते आठवी गट – प्रथम मोहित नीलकंठ सुतार (विद्यामंदिर प्रशाला) , द्वितीय अनुश्री अभिजीत राणे (एस.एस. हायस्कूल), तृतीय गौरेश मुकेश काडगे (विद्यामंदिर) आदी विद्यार्थी यशस्वी झाले आहेत . सर्व विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या वतीने सन्मान चिन्ह , सन्मान पत्र , रोख रक्कम देवून गौरविण्यात आले .

error: Content is protected !!