खारेपाटण येथे कै.कांता आप्पा शेट्ये यांना ग्रामस्थ व विविध संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण…

” असा धुरंदर नेता पुन्हा होणे नाही..– श्री रवींद्र जठार
खारेपाटण गावच्या इतिहासात ज्यांचे ठळक अक्षरांत नाव नोंदविले गेले असे सर्वच शेत्राने दखल घ्यावी असे बहुआयामी नेतृत्व म्हणजे खारेपाटण चे सुपुत्र कै.सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये होय.असा धुरंधर सामाजिक राजकीय नेता पुन्हा होणे नाही.” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण चेअरमन श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी कै.कांता आप्पा शेट्ये यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली शोकसभा कार्यक्रमात बोलताना काढले.
खारेपाटण गावचे सुपुत्र व कणकवली पं.स.माजी सभापती कै.सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये यांचा भावपूर्ण श्रद्धांजली व सामुदायिक शोकसभेच्या कार्यक्रमाचे आयोजन गावातील विविध सामाजिक संघटना,सहकारी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दी.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण हायस्कूलच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले होते.
यावेळी खारेपाटण उपसरपंच श्री महेंद्र गुरव,ग्रा.पं. सदस्य सुधाकर ढेकणे,जयदीप देसाई,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे, खारेपाटण सोसायटीचे व्हॉईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर, संचालक विजय देसाई,सचिव – अतुल कर्ले, प.पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र ब्रम्हदंडे संचालक श्री नंदकिशोर कोरगावकर,राजेंद्र वरुणकर,सचिव – शुभम मोरे,नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक श्री परवेज पटेल,खारेपाटण व्यापारी असो. अध्यक्ष श्री चेतन हूले,खारेपाटण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री प्रणय गुरसाळे,खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे उपाध्यक्ष श्री मंगेश गुरव,झुंझार मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये,खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत,ज्येष्ठ कार्यकर्ते चंदू देवस्थळी,सुधीर कुबल यांसह शिक्षक वृंद व मान्यवर उपस्थित होते. तर या श्रद्धांजली कार्यक्रमाला कै.कांता आप्पा शेट्ये यांच्या थोरल्या कन्या सौ सविता टोपले, सावंतवाडी यांसह पुतणे श्री शैलेंद्र गजानन शेट्ये व जितेंद्र गजानन शेट्ये,स्नुषा सौ समीक्षा शैलेंद्र शेट्ये उपस्थित होते.
प्रारंभी कै.सूर्यकांत शेट्ये यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपस्थित सर्वच ग्रामस्थ व मान्यवरांच्या वतीने कांता आप्पांना सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कै.कांता आप्पांच्या आठवणींना भावपूर्ण श्रद्धांजलीतून उजाळा देण्यात आला. “तर खारेपाटण तालुका निर्माण व्हावा म्हणून ज्यांनी प्रथम जन आंदोलन उभे करून लढा दिला अशा लढवय्या नेत्याला खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल खारेपाटण तालुक्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करून दाखवणे हीच खरी कांता आप्पांना श्रद्धांजली ठरेल.” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले.
यावेळी प्रवीण लोकरे, राजेंद्र ब्रम्हदंडे,मंगेश गुरव,सविता टोपले,जितेंद्र शेट्ये,नंदकिशोर कोरगावकर,मंगेश गुरव,संजय सानप तसेच ग्रामस्थानी आपली मनोगते व्यक्त करत कै.कांता आप्पा शेट्ये याना शाब्दिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.