कुणकेश्वर भेटीसाठीच्या पारंपरिक वाटाची श्रमदानातून स्वच्छता मोहीम

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या देव तरंगाच्या स्वारीची ३९-४० वर्षांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळास शाहीभेट ‘श्रीं’च्या हुकमाने होत आहे. यनिमित्ताने श्रींची स्वारी पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण करत पाई जाणार आहे. या निमित्ताने आचरा येथील ग्रामस्थांनी पारंपरिक जाण्यासाठीच्या वाटा श्रमदानातून साफसफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. यात महिला, पुरुष, जेष्ठ तरुणही आनंदाने सहभागी झाले आहेत शुक्रवारी आचरा पारवाडी ते करिवणे घाटी शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत साफ स्वच्छ केली. यावेळी सहभागी झालेल्या दोनशेहुन अधिक ग्रामस्थांच्या जेवणाची सोय आचरा गावचे सुपुत्र कणकवली येथील उद्योजक आबा दुखंडे यांनी केली होती. यामुळे श्रमदानात सहभागी झालेल्या ग्रामस्थांना वनभोजनाचा आनंद ग्रामस्थांना लुटता आला.
प्रथे परंपरे प्रमाणे संस्थानिक इनामदार श्री देव रामेश्वर आपल्या राजेशाही सरंमजामासह, ढोलताशा, छत्रचामर, रयतेसह श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळास भेट देतील. सदर कार्यक्रम ऐतिहासिक व्हावा या दृष्टीने प्रत्येक आचरेवासीय आणि आचऱ्याशी संबंधित असलेल्या बंधू भगिनींचा सहभाग सहकार्य देत आहेत शुक्रवारी डोंगरेवाडी, पारवाडी नागोचीवाडी येथील दोनशेहुन अधिक ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक मार्ग साफ करण्याचे काम हाती घेतले होते. जाणाऱ्या मार्गांवर पुर्णतः झुडपे आल्याने मोठा अडथळा होता तसेच अवास्तव वाढलेल्या रानटी झुडपांमुळे हा भाग अडचणींचा जगलमय बनला होता. सकाळी श्रमदानातून मार्ग स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले होते. याला प्रतिसाद देत या भागातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता. दिवसभर चाललेल्या या साफसफाई मोहिमेत झाडाझुडपांनी अडवलेला रस्ता पुर्णतः साफ स्वच्छ केला गेला. यावेळी दुपारी ग्रामस्थांनी एकत्र बसून वनभोजनाचा आनंद घेत पुन्हा काम हाती घेतले होते.