रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्याकडून शेठ न.म. विद्यालय खारेपाटण, प्रशालेस 2 in 1 कलर प्रिंटर व कॉपिअर भेट

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा. रो. श्री.प्रशांत गुळेकर यांच्या प्रयत्नातून प्रशालेस टू इन वन कलर प्रिंटर व कॉपीअर भेट देण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या माध्यमातून यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन 200 बेंचेस प्रशलेस भेट देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रशालेचे विश्वस्त श्री. प्रशांत गुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब वैभववाडी चे सचिव रो.श्री. सचिन रावराणे, खजिनदार रो. प्रा. नामदेव गवळी, तसेच माजी अध्यक्ष रो. संजय रावराणे आणि रो. AG डॉ. विद्याधर तायशेट्ये, रो. सौ.मेघना गुळेकर मॅडम, रो. सौ. संजना रावराणे मॅडम रो. मुकुंद रावराणे, झुंजार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री. संकेत शेटये व संकेत लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने प्राचार्य श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, विश्वस्त श्री राजू वरूणकर, श्री. योगेश गोडवें यांनी आभार मानले.

error: Content is protected !!