आचरा येथील भगवती वाचनालयास जिल्हा ग्रंथालय पदाधिकारी यांनी भेट देऊन ग्रंथालयांच्या समस्या जाणून घेतल्या.

वाचनालय पाहून समाधान व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने देवगड तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाची पाहणी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने देवगड तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाना भेट देऊन ग्रंथालयांची माहिती व समस्या जाणून घेतल्या यामध्ये जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व राज्य ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी मंगेश मसके, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी व रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय कुडाळचे ग्रंथपाल राजन पांचाळ व सतिश गावडे, तसेच अँड.मंदार मसके ,उमाबाई बर्वे लायब्ररी व ग्रंथसंग्रहालय देवगडचे ग्रंथपाल प्रशांत बांदकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भगवती वाचनालयाचे उपाध्यक्ष महादेव ऊर्फ तात्या प्रभू यानी मान्यवरांचे गुलाबपुष्प व डॉ भालचंद्र मुणगेकर लिखित ” वेद” हे पुस्तक देऊन स्वागत केले. यावेळी वाचनालयाचे कार्यकारीनी सदस्य संतोष लब्दे वाचनालयाचे कर्मचारी विश्वास मुणगेकर, सोमनाथ रुपे सौ हर्षदा मुणगेकर आदी उपस्थित होते. जिल्हा संघाचे अध्यक्ष श्री मसके यानी वाचनालयाच्या समस्या जाणून घेतल्या वाचनालय पाहून समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने देवगड तालुक्यातील ओवळेश्वर वाचनालय मोर्वे, ग्रामोन्नती वाचनालय हिंदळे, श्री. रामेश्वर वाचनालय मिठबांव, मुक्तव्दारसागर वाचनालय तांबळडेग, उमाबाई बर्वे लायब्ररी व ग्रंथ संग्रहालय देवगड, दिशा बहुद्देशीय ग्रंथालय जामसंडे, मालती जोशी ग्रंथालय वाडा , शेतकरी वाचनालय पुरळ-हुर्शी, न.ची.केळकर ग्रंथालय मोंड, पावणाई वाचनालय शिरगाव या ग्रंथालयाना भेटी देऊन ग्रंथालय कार्यकर्ते आणि ग्रंथालय कर्मचारी यांच्या समस�