कासार्डे मध्ये मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अवैध वाहतूक प्रकरणी आरटीओचे वेधले लक्ष

कणकवली तालुक्यात कासार्डे गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सिलिका उत्खनन करून कोल्हापूर, रत्नागिरीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. या वरती महसूल यंत्रणेचा कोणतेही नियंत्रण करत नसून २०२१ सालामध्ये अशाच प्रकाराच्या तक्रारी नंतर तत्कालीन पालकमंत्री व तत्कालीन खासदार व मी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दोन पथके करून ट्रेडिंग लायसन्सच्या नावाखाली उत्खननाबाबत चौकशी करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सदर कासार्डे येथील सिलिका गौण खनिज च्या दोन लिज पट्टे मंजूर आहे. त्या लिज धारकांनी सिलिकांचे तयार माल (फिनिश प्रोडक्ट) ट्रेडिंग करण्याच्या ट्रॅडरला लायसन्स द्यायचे आहे. पण तसे न होता शेकडो ट्रेडिंग लायसन्सच्या नावाखाली सिलिकाचे उत्खनन करून त्या ठिकाणी ट्रेडिंग लायसन्स धारक वाळू धुण्याकरिता चिरे बांधकाम करून तलाव बांधून वॉशिंग प्लांट निर्माण करतात व त्यांची वॉशिंग प्लांटचे पाणी बाहेर उघड्‌यावर सोडून दिले जाते.
मागील वर्षात सर्वांच्या तक्रारी करून २६/०३/२०२१ रोजी ट्रेडिंग लायसन्सधारकांची उपविभागीय दंडाधिकारी यांच्या माध्यमातून तहसीलदार कणकवली आणि तहसीलदार वैभववाडी यांच्या पथका कडून चौकशी झाली. त्यांचां अहवाल तयार झाला त्या अहवालामध्ये १८ अनधिकृत ट्रेडिंग धारक आढळले. त्यामध्ये अन्य कोणत्याही परवाना घेतल्या नसल्याचे अहवालात नमूद केले. अशा प्रकारच्या ट्रेडिंग लायसन धारक तयार माल ठेवण्याकरिता अधिकृत अकृषीत परवाना किंवा सिमांकन करत नाही. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा दाखला घेत नाहीत, विनावाहतूक पास वाहतूक करतात, स्टॉकरजिस्टर करत नाहीत. अशा अनेक त्रुटि आढळून आले आहेत. तो अहवाल सोबत जोडत आहे.
त्याचप्रमाणे कासार्डे या गावात नागसावंतवाडी है इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये येते. या इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये ट्रेडिंग लायसन्सची परवानगी अनधिकृत उत्खनन झाल्याबाबत तक्रार झाली. त्यावेळी इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये परवानगी दिलेल्या वीस ते पंचवीस लायसन्स धारकांना स्थगिती देण्यात आली होती.
मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात सिलिका उत्खनन केले जात आहे. त्या ठिकाणी तलाठी, सर्कल दुर्लक्ष करून आर्थिक देवाणघेवाण करून उत्खनन करत आहे. आणि पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. याबाबत मागील २९ सालामध्ये आंदोलन केल्याने प्रांताधिकारी कणकवली यांच्याकडे अनेक मु‌द्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी २४ तास जिल्ह्याच्या सिमेवरती सर्कल तलाठी पोलीस भरारी पथके नेमून चौकशी केली जात होती. त्या चोरट्या सिलिका, वाळू उत्खनाला आळा बसला होता. त्यावेळी आंदोलनाच्या वेळी प्रांताधिकारी कणकवली यांच्याकडे ज्या मुद्द्‌यांची चर्चा करण्यात आली त्या मुद्द्‌यांची प्रोसेसिंग देत आहे. त्यांचे अवलोकन करून सिलिका उत्खनावरती आळा घालावा. शासनाने गौण खनिज उत्खननाबाबत नवीन शासननिर्णय आदेश काढून कारवाईचे सर्व अधिकार संपूर्ण जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा या विरोधात आंदोलन केली जाईल याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

error: Content is protected !!