संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागात दुसऱ्या क्रमांकाची सदस्यता नोंदणी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष सन्मान

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व बैठक आज मुंबई येथे पाटकर हॉल, न्यू मरीन लाइन्स येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलार, विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील,राजेश पांडे,भाजपचे सर्व मंत्री तसेच सर्व आमदार,सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी,संघटन मंत्री व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्यात संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी कार्यक्रम यशस्वी पद्धतीने राबवणाऱ्या जिल्ह्यांचा तसेच विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक सभासद नोंदणी झालेल्या आमदारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये संपूर्ण राज्यात ग्रामीण विभागात दुसऱ्या क्रमांकाची सदस्यता नोंदणी सिंधुदुर्ग जिल्ह्याने केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत व नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक रणजीत देसाई,महेश सारंग यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील शहरी v ग्रामीण अशा मिळून एकूण ७८ संघटन जिल्ह्यात पहिल्या दहा क्रमांकात आहे ही अभिमानाची बाब आहे.
संघटन पर्वाच्या निमित्ताने सर्वच जिल्ह्यांना दिलेले सभासद नोंदणीचे उद्दिष्ट १९ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करून संपूर्ण राज्यातून किमान दीड कोटी सदस्य संख्या करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी संघटन पर्व अंतर्गत झालेल्या १ कोटी सभासद नोंदणीचा आढावा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेले प्राथमिक सदस्य संख्येचे उद्दिष्ट पूर्ण करावे व प्रत्येक बुथवर किमान तीन सक्रिय सदस्य नोंदणी करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी तसेच अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, व जिल्हा सरचिटणीस तथा सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक महेश सारंग उपस्थित होते.
या अभियानाचा जिल्हा संयोजक म्हणून काम करताना आमचे मार्गदर्शक नारायणराव राणे साहेब, रविन्द्रजी चव्हाण साहेब,पालकमंत्री नितेशजी राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा सरचिटणीस व अभियानाचे सहसंयोजक महेश सारंग,संदीप साटम, श्वेता कोरगावकर, मनीष दळवी,संदीप मेस्त्री,राजू परब तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी ,मंडल अध्यक्ष व बुध स्तरापर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशी प्रतिक्रिया अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

error: Content is protected !!