वाळू, चिरे, सिलिकाच्या अवजड वाहतुकीमुळे फोंडा घाट राधानगरी रस्ता नादुरुस्त

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

अवजड वाहतुकीवर कारवाई करा अन्यथा आंदोलन छेडणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यत मालवण कणकवली तालुक्यातून अवजड वाहनाने ओव्हरलोड व विना परवाना वाहतूक केली जात आहे. चिरे, वाळू, सिलीका मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असल्यामुळे एकमेव कोल्हापूरला जोडणारा फोंडा राधानगरी रस्ता नादुरुस्त झालेला आहे. या नादुरुस्त रस्त्यामुळे रुग्णवाहिके मधून पेशंटला नेताना पेशंटची वाहतूक अवघड झालेली आहे. कारण ओव्हरलोड व मोठ्या गाड्‌यांच्या वाहतुकीमुळे फोडा घाट पासून राधानगरीपर्यंत पूर्ण रस्ता नादुरुस्त झालेला आहे. याबाबत कारवाई करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी राजन नाईक, राजेश टमसाळी, समीर परब, संतोष सावंत उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे या नादुरुस्त रस्त्यावरती होणाऱ्या वाहतू‌किला सर्व वाहनांना एलईडी लाईट वापरून समोरून येणाऱ्या छोट्‌या वाहनांना अवघड बनले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. फोडा राधानगरी घाटमार्गे वाहतूक होत असल्यामुळे मागील दोन वर्षांपूर्वी आंदोलन केल्यामुळे प्रांत कार्यालय कणकवली यांनी २४ तास आपल्या फोडा चेकनाक्यावरती भरारी पद्धत सर्कल यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या काळात काही काळ नियंत्रण आले होते. पण आता मालवण तळाशील कालावल खाडीतून वाळू त्याचप्रमाणे या भागातील विविध ठिकाणी असलेल्या चिरेखाणी यांची कोल्हापूर बेळगाव आचारा मार्गे कणकवली फोडा राधानगरी येथे ओव्हरलोड विनापरवाना वाहतूक करून कणकवली पोलीस स्टेशन आणि कणकवली तहसीलदार व प्रांतकार्यालयाचा ह‌द्दीतून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असते. त्याकडे महसूल यंत्रणा पूर्णतः दुर्लक्षित किंवा आर्थिक देवाण-घेवाण करून वाहतूक सुरू ठेवत आहे. तरी यावरती नियंत्रण न आल्यास फोंडा घाटाच्या चेकनाक्यावर शिवसैनिक व नागरिक यांना घेऊन आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी. असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर व शिष्टमंडळाने दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!