कणकवली तालुका पत्रकार समितीचा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते सत्कार

मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श पत्रकार समिती पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

कणकवली तालुका पत्रकार समितीचे कार्य उल्लेखनीय; अजयकुमार सर्वगोड

कणकवली तालुका पत्रकार समिती ला मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ पुरस्कार जाहीर झाला. नुकतेच परभणी येथे या पुरस्काराचे वितरण झाले. पत्रकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार परभणी येथे स्वीकारला. याबाबत माहिती मिळताच कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आज मंगळवारी कणकवली शासकीय विश्रामगृह येथे कणकवली तालुका पत्रकार समितीचां सत्कार केला. कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत व पदाधिकाऱ्यांनी हा सत्कार स्वीकारला. कणकवली तालुका पत्रकार समिती हे नेहमीच उल्लेखनीय कौतुकास्पद असे उपक्रम राबवत असते. याबद्दल समितीच्या पाठीवर ही कौतुकाची थाप म्हणून हा सत्कार सोहळा असल्याचे गौरवउद्गार कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी काढले. याप्रसंगी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, माजी अध्यक्ष रमेश जोगळे, लक्ष्मीकांत भावे, उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले, खजिनदार योगेश गोडवे, कार्यकारणी सदस्य भास्कर रासम, योगेश गोडवे, उमेश बुचडे, राजेश सरकारे व मनोज परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!