वैभववाडी येथे सिंधुदुर्ग अध्यापक संघाच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परिक्षेचे आयोजन
तालुक्यातील एकुण ११७ विद्यार्थ्यांचा सराव परिक्षेत सहभाग
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळ पुणे. यांच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती परिक्षेचे आयोजन करण्यात येते. सदर परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर तसेच खाजगी क्लासेस च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. या विद्यार्थ्यांची परिक्षेची परिपुर्ण तयारी होण्याच्या उद्देशाने त्यांचा अचुक सराव व्हावा. प्रश्न व परिक्षेचा कालावधी यांची विद्यार्थ्यांना सांगड घालता यावी या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाच्या वतीने आज जिल्ह्यात सर्वत्र ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी व छत्रपती शिवाजी विद्यालय नेर्ले तिरवडे येथे सदर परिक्षेस पाचवी चे ५५ तर आठवी चे ६२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
सराव परिक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे…
इयत्ता पाचवी मध्ये गौरांग प्रशांत ढवण. ३०० पैकी २१२ गुण मिळवून प्रथम,श्रीया दिपक पाटील ३०० पैकी १८६ गुण मिळवून द्वितीय तर शुभ्रा मुरारी कडू ३०० पैकी १८८ गुण मिळवून तालुक्यात तृतीय तसेच इयत्ता आठवी मध्ये
प्रथम क्रमांक वैष्णवी गणेश हावळ. ३०० पैकी १५४ गुण मिळवून तालुक्यात प्रथम, वेदिका संतोष माने. ३०० पैकी १५० गुण मिळवून द्वितीय तर सतेज दिनकर केळकर. ३०० पैकी १४८ गुण मिळवून तालुक्यात तृतीय सर्व सहभागी विद्यार्थी व उज्वल यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तालुक्यातील सर्व परीक्षार्थीना विना मोबदला परीक्षेत सहभागी व्हावे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पतपेढीचे वैभववाडी तालुका संचालक जयवंत पाटील यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी अर्जुन रावराणे विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, मांगवली हायस्कूल मुख्याध्यापक पाटील सर ,छत्रपती शिवाजी विद्यालय नेर्ले तिरवडे चे मुख्याध्यापक जयदीप सुतार,उंबर्डे हायस्कूल चे मुख्याध्यापक एस.के.राठोड, नेर्ले प्राथमिक मुख्यध्यापक फोंडके सर, अध्यापक संघाचे जेष्ठ पदाधिकारी एस.बी.शिंदे, अध्यापक संघाचे वैभववाडी तालुका पतपेढी संचालक जे.के.पाटील तसेच शिक्षक पी.बी पवार, एम.एस. चोरगे, शिंदे मॅडम ,एस.एस.पवार मॅडम , आर.केए.अनवारे मॅडम तसेच परिक्षे दरम्यान स्वयंसेवक म्हणून साहिल शिरावडेकर,साईराज वावरे, पियुष जाधव आणि परिक्षार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.