राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी विस्तार अधिकारी शत्रुघ्न दळवी यांचे निधन
कुडाळ तालुक्यातील उपवडे येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शत्रुघ्न न्हानू दळवी यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मुंबई कल्याण येथे हा हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी निधन झाल्याचे घोषित केले. माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राजापूर म्हणून त्यांनी निवृत्ती पूर्वी बरीच वर्ष काम केलेले आहे. २००८ /९ मधील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे. उपवडे येथील त्यांच्या गावी सर्व श्राद्ध विधी केले जाणार आहेत.