ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांची प्रमुख उपस्थिती

ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राजापूर तहसीलदार श्री विकास गंबरे साहेब यांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे राजापूरचे तहसीलदार श्री विकास गंबरे साहेब आणि प्रमुख पाहुण्या पत्रकार कु. अस्मिता गिडाळे (माजी विद्यार्थिनी),58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग चे सुभेदार मेजर कुलदीपकर सुधाकर गोविंदराव, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, यश कम्प्युटर खारेपाटणचे संचालक श्री मंगेश गुरव , सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए.डी.कांबळे, प्राचार्य श्री संजय सानप ,पर्यवेक्षक श्री.संतोष राऊत व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचा मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निम्मित जमलेल्या ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर इयत्ता बारावीच्या विविध विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षक व प्रशालेविषयी कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. पुढील आयुष्यात प्रशालेमध्ये दिलेली शिकवण उपयोगी येईल अशा प्रकारची मनोगते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राजापूरचे तहसीलदार श्री विकास गंबरे साहेब यांनी आपल्या मनोगतातून जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करा.कष्ट व मेहनत करून जीवनात यशस्वी व्हा .तसेच पत्रकार कुमारी अस्मिता गिडाळे यांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा असा सल्ला दिला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरसाळे सर यांनी केले व आभार श्री वरूणकर सर यांनी केले.

error: Content is protected !!