आचरा ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रमडाळपस्वारीसाठी ग्रामस्थांना टोप्या वाटप

विकासाचा आणि नाविन्याचा ध्यास घेतलेल्या आचरा ग्रामपंचायती तर्फे सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी आणि सहका-यांच्या सहकार्याने सफेद टोप्यांचे वाटप करण्यात आले होते.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संस्थान आचरेची डाळपस्वारी रविवार पासून सुरू झाली आहे. सकाळी किंवा दुपारी नियोजित स्थानापासून दुसऱ्या वाडीतील डाळपसाठी निघणारी श्रींची स्वारी भर उन्हातूनच जात आहे.यामुळे देवस्वारींसोबत जाणारया ग्रामस्थांना उन्हापासून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सफेद टोप्यां आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या.यांचे वाटप ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून वाडीवाडीवर करण्यात आले.पिरावाडी येथे ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर,देवूळवाडी येथे महेंद्र घाडी,पुजारे,वरचीवाडी येथे पंकज आचरेकर यांसह अन्य सदस्यांनी आपापल्या भागात या टोप्यांचे वाटप केले.