जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याच्या आरोपातून चौघे निर्दोष
संशयितआरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
देवगड तालुक्यातील सौंदाळे हेळदेवाडी येथील भक्ती भरत नार्वेकरसहीत पती शेजाऱ्यांना जमिनीच्या वादातून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तेथीलच संतोष गुरव, शर्मिला गुरव, चंद्रकांत गुरव व रेश्मा गुरव यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि. १९ ऑक्टोबर २०२० रोजी सायं. ७ वा.च्या सुमारास फिर्यादीचे पती भरत व रिक्षा चालक दिपक कामतेकरला घेऊन फिर्यादीचा मुलगा आशिष याला पडेल येथे सोडायला गेले होते. रात्री ८.३० वा. च्या सुमारास ते परत येत असताना आरोपींनी स्कुटरने रिक्षासमोर दांडे घेऊन येत फिर्यादी भक्तीसहीत तीचे पती भरत व शेजारी दिपक कामतेकर, दर्शना दिपक कामतेकर, तुळशिदास नार्वेकर यांनी आरोपी चंद्रकांत गुरव यास शिवीगाळ केल्याचा गैरसमज करून घेऊन संगनमताने सर्व आरोपींनी दांड्याने डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी प्रा. आ. केंद्र पडेल येथे उपचार घेत असताना फिर्यादी भक्तीहिने आरोपींविरूद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३०७, ३२३, ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत आरोपींविरूद्ध सबळ पुरावा न आल्याने आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली