टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्या गाळमुक्त करणार!
पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते गाळमुक्त नदी उपक्रमाचा वरवडे येथे शुभारंभ
येत्या काळात पूरस्थिती निर्माण न होण्याच्या दृष्टीने काम सुरू
पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांची पात्रे गाळ मुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात पुराचा धोका संभावतो. म्हणूनच जिल्ह्यात ‘गाळ मुक्त नदी मोहिम’ राबविणे आवश्यक आहे. आज वरवडे येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला असून १५ मे पर्यंत टप्याटप्याने जाणवली नदी गाळ मुक्त करणार असल्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत गाळ काढण्यासाठी काही ठिकाणे आम्ही निश्चित केली होती. पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गाळ मुक्त नद्या करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून या कामाचा शुभारंभ करणार होतो.त्यानुसार हे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम १५ मे पर्यंत चार टप्प्यात होणार आहे. तसेच इतरही कामे लवकरच सुरू होतील. तसेच गाळ काढण्यासाठी आलेल्या निवेदनांनुसार निधीची तरतूद करून सर्व कामे पूर्ण केली जातील, असे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.
जानवली नदीवरील वरवडे येथे सेंट उर्सुला हायस्कूलच्या पुलानजिक नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ श्री. राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव, उपअभियंता मंगेश माणगांवकर, यांत्रीकेचे उपअभियंता श्री. चौगुले, निवासी नायब तहसिलदार मंगेश यादव, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री दिलीप तळेकर, माजी सभापती प्रकाश सावंत, सरपंच करूणा घाडीगांवकर, उपसरपंच अमोल बोन्द्रे, अशोक राणे, सोनू सावंत, इब्राहीम शेख, महेश लाड, आनंद घाडीगांवकर, सुभाष मालंडकर, हनुमंत बोन्द्रे, रमाकांत घाडीगांवकर, छोटू खोत, मंदार मेस्त्री, काका कदम, पाडुरंग मेस्त्री, पुंडलिक निकम, बंडू शिरसाट, श्री. हिंदळेकर, भास्कर सावंत, सुनिल सावंत, प्रकाश मेस्त्री, सत्यवान मेस्त्री, शिवदास सादये, मारुती वरवडेकर, प्रदीप सावंत, सिद्धेश मेस्त्री, अनंत घाडी, पप्पू पुजारे, सागर राणे, विजय कदम, सोहेल खान आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाबाबत आम्ही गेल्या आठवड्यात काही ठिकाणे निश्चित केली होती. त्यानुसार आज या गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ होत आहे.
नद्यांमधिल गाळ काढण्यासाठी अन्य निवेदनेही आलेली आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत निधीची तरतूद करून आलेल्या प्रत्येक निवेदनानुसार गाळ काढण्याचे काम पूर्ण केले जाईल. जेणेकरून येणाऱ्या कालावधीत पूरपरिस्थिती उद्भवणारच नाही, असे नियोजन आम्ही केले असल्याची माहिती मत्स्योद्योग व बंदरविकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
जिल्ह्यात काही ठिकाणी मोठी रस्त्यांची कामेही सुरू आहेत. त्यामुळे काढण्यात आलेला गाळ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत योग्य प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अशा ठेकेदारांना अथवा क्रीडाई संस्थांना देण्यासंदर्भात बोलणे सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारे काढलेला गाळ तेथेच टाकला जाणार नाही. तसेच त्यापासून काही दुर्गंधी अथवा अडचण निर्माण होणार नाही यादृष्टीने त्याचा योग्य वापर करण्याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत योग्य कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.