रस्ते सजले वाटा मोकळ्या झाल्याआता वेध डाळपस्वारीचे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी रविवार पासून
रविवार पासून सुरू होणारया इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या डाळपस्वारी मुळे गेले काही दिवस आचरा ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे .रस्त्ये झाडून सडा रांगोळी घालून सजवले आहेत.काही ठिकाणी मंडप उभारत रस्ता दुतर्फा सुशोभिकरण करण्यात आले आहे.
मालवण तालुक्यातील जागृत आणि प्राचिन शीवस्थानामुळे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची महती सर्वदूर पसरली आहे.येथील सण उत्सव संस्थानी थाटात साजरे होत असतात.अशाच प्रकारे दर तीन वर्षांनी होणारी डाळपस्वारी या वर्षी श्रींच्या कौल प्रसादाने रविवार दोन फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. रविवारी सकाळी रामेश्वर मंदिर येथून श्रींची स्वारी डाळपस्वारी ला बाहेर पडणार आहे.आचरा बाजारपेठ फुरसाई मंदिर येथील डाळप करून मिराशी वाडी ब्राम्हणदेव येथे भेट दिल्यानंतर सायंकाळी नागझरी गिरावळ मंदिर (पूर्वी आकारी)येथे विसावणार आहे.रविवारी निघणारया या नियोजित रस्त्यावर देवूळवाडी परडेकर मंडळ, बाजारपेठ,वरचीवाडी, मिराशीवाडी ग्रामस्थांकडून रस्ते सडासारवन करुन रांगोळी घालून,सजविले आहेत.फुरसाई मंदिर, मिराशी वाडी येथे आकर्षक मंडपासहित रस्ता दुतर्फा विविध रंगांच्या फुलांच्या माळांनी सजविले आहेत. श्रींच्या स्वारी सोबत येणारया भाविकांसाठी या भागातील ग्रामस्थांकडून शितपेय खाद्यपदार्थंचीही व्यवस्था करण्यात आली आहे.