कणकवली तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्रदान
हा सन्मान कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकारांचा, अध्यक्ष: अजित सावंत
मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार कणकवली तालुका पत्रकार संघाला मिळाला. त्याचे वितरण शनिवार 1 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख , विश्वस्त किरण नाईक, पत्रकार विशाल परदेशी , नगराध्यक्ष विनोद बोराडे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील सेलू येथे झाले. या सोहळ्यात सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मराठी पत्रकार परिषदेने कणकवली तालुका पत्रकार संघाचा गौरव केला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे , संघाचे सचिव माणिक सावंत, उपाध्यक्ष अनिकेत उचले, सदस्य उमेश बुचडे उपस्थित होते
यावेळी अध्यक्ष अजित सावंत यांनी हा सन्मान कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकारांचा असून पत्रकार संघाने गेल्या अनेक वर्षात पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवले त्याचबरोबरच जे सामाजिक काम केले त्याची दखल घेऊन पत्रकार संघाला हा सन्मान मिळाल्याचे अध्यक्ष सावंत यांनी सांगितले यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.