विनापरवाना सागवान वाहतूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

सागवान सहित बोलेरो पिकप गाडी जप्त

देवगड तालुक्यातील साळशी येथे विनापरवाना साग गोल इमारती नग वाहतूक करतेवेळी बोलेरो पिकप मुद्देमाला सहीत हस्तगत करण्यात आली. कामी विनापरवाना वाहतुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. जप्त बोलेरो पिक अप साग इमारती माला सह फोंडा विक्री आगर येथे संरक्षणासाठी ठेवण्यात आलीआहे. या प्रकरणी दिगंबर गावकर, संजय वळंजु, संकेत तर्फे यांच्या वर वन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून
बोलेरो पिकप क्रमांक MH07-0312 हे वाहन जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. नवा किशोर रेड्डी उपवनसंरक्षक सावंतवाडी, डॉ. सुनील लाड सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी व श्री राजेंद्र घुणकीकर वनक्षेत्रपाल कणकवली यांचे मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण परीट वनपाल देवगड आप्पासो राठोड वनरक्षक मिठबाव रामदास घुगे वनरक्षक ठाकूरवाडी यांनी ही कारवाई केली आहे.

error: Content is protected !!