सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा 3 फेब्रुवारी रोजी

गेल्या अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा राणे कुटुंबीयांकडे नियोजन समितीचे अध्यक्ष पद

तिन्ही राणे एकाच वेळी नियोजन समितीच्या सभेत येणार असल्याने सभेची उत्सुकता वाढली

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षे नंतर राणे कुटुंबियाकडे पालकमंत्री पद आल्यानंतर ही पहिली सभा होत आहे. तसेच यावेळी समोर विरोधी पक्षाचा कोणताही आमदार किंवा खासदार नसताना ‘सबकुछ राणे” या धर्तीवर ही सभा होत असल्याने या सभेमध्ये कसे विषय चालणार व विरोधी पक्षाची उणीव कोण भरून काढणार? याची आता उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या यापूर्वीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, तसेच इतिवृत्ताच्या कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, 2024 -25 व जानेवारी 25 पर्यंतच्या खर्चास मान्यता देणे, 2025 26 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे. अनुसूचित जाती उपायोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना 2024 25 मधील खर्चास जानेवारी 2025 पर्यंत मान्यता देणे , याच 2025 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे व अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणारे विषय या विषयावर सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी याबाबत पत्र काढले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!