सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी नव नवीन संकल्पना तयार करून विकासाचे रोल मॉडेल बनवावे

मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

,लोरे नं.१ गावातील श्री देव रूजेश्वर उद्यानचे झाले उद्घाटन

सिंधुदुर्ग हा विकासाचा मॉडेल बनला पाहिजे.ग्रामीण भाग विकास प्रक्रियेत आला पाहिजे यासाठी ग्रामपंचायतींनी नव नवीन संकल्पना तयार कराव्यात.लोरे नंबर १ ग्रामपंचायतने जशा शासनाचा आणि लोकसहभाग घेवून उपक्रम यशस्वी केला तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रयत्न करावा. नावीन्यपूर्ण संकल्पना ग्रामपंचायत स्थरावर राबवाव्यात त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू. आवश्यकतेप्रमाणे स्वतंत्र हेड खाली निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
लोरे नंबर १ गावातील श्री देव रूजेश्वर उद्यानचे उद्घाटन आणि मनोज रावराणे मित्रमंडळ आयोजित लोरे पंचक्रोशी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फलकाचे अनावरण करून झाले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख,प्रांत अधिकारी जगदीश कातकर,तहसीलदार दीक्षांत देशपांडे,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे , भाजप विधासभा प्रमुख मनोज रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, भाजप पदाधिकारी संतोष कानडे,संदीप साटम,राजन चिके,सुरेश सावंत,सरपंच अजय रावराणे,बंड्या मांजरेकर,रवी पाळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक गाव म्हणून आपण काय काय करू शकतो हे सरपंच अजय रावराणेनी त्यांच्या कारकीर्दी मध्ये सातत्याने करून दाखवून दिलेला आहे.त्यांना गावाची मिळालेली साथ आणि उपसरपंच गुरव आणि सर्व सदस्य यांचा असलेला पाठींबा यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट असे गार्डन या ठिकाणी तयार झाले आहे. गाव म्हणून आपण एक संघ राहून विकासाला प्राधान्य देता. शासनाचा निधी लोकप्रतिनिधींचा निधी हा मिळतोच मात्र ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून निधी उभा करावा आणि विकास कामाला गती द्यावी हे निश्चितच आदर्श व्रत आहे. असे गौरवोद्गार मंत्री नितेश राणे यांनी गावाप्रती व्यक्त केले.
ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग विकसित झाला पाहिजे असे स्वप्न माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी यांनी पाहिले.तसे उपक्रम कार्यकर्त्यांना दिले. यापूर्वीचे पालकमंत्री रवी चव्हाण साहेब यांनीही प्रयत्न केले.आतापर्यंत आपण मोदी साहेबांचा गुजरात मॉडेल पाहिले. राणेसाहेबांचे सिंधुदुर्ग विकासाचे मॉडेल पाहिजे. सिंधुदुर्ग मध्ये लोरे गाव हे विकासाचे मॉडेल प्रसिद्ध होणार. असा विश्वासही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी मधील माझ्या सहकाऱ्यांच्या अविरत कामामुळेच महाराष्ट्रभर तुम्हाला नितेश राणे आमदार,मंत्री म्हणून फिरत असताना दिसतो. आज नाशिकला,उद्या चंद्रपूरला, परत मुंबईला असे हिंदू सभा आणि इतर बैठकांना मला जाण्यासाठी जो वेळ मिळतो तो माझ्या या जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील सगळ्याच सहकाऱ्यांमुळे शक्य होते. या पदाधिकाऱ्यांनी मला कधी माझ्या मतदारांपासून लांब जायला दिलनाही. नेहमी माझ्याबरोबर उभे राहिले आणि मनोज रावराणे सारखे मला सहकारी भेटले असल्यामुळे आज तुमचा आमदार,नामदार म्हणून तुमच्या समोर इथे उपस्थित आहे.मी मनोज रावराणे यांना त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो अशा शब्दात मनोज रावराणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!