कणकवल नगरपंचायतची बाजारपेठेत अतिक्रमणावर कारवाई

मुख्याधिकारी गौरी पाटील कारवाईत स्वतः सहभागी
रस्त्यावर दुकाने लावल्या प्रकरणी काही व्यापाऱ्यांना दंड
दंडात्मक कारवाईबाबत व्यापाऱ्यांमधून नाराजी
कणकवली बाजारपेठेमध्ये रस्त्यावर अतिक्रमण केलेले काही व्यापारी व विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वतः फिल्डवर उतरत या कारवाईचे नेतृत्व केले. तसेच कणकवली शहरातील नागरिकांना या अतिक्रमणांचा त्रास होता नये याची दक्षता घ्या अन्यथा पुन्हा कारवाई केली जाणार असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. कणकवली बाजारपेठेत रस्त्यावर दुकाने थटणाऱ्या काही विक्रेते व व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 53 व्यवसायिकांवर 10 हजार 150 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह नगरपंचायत चे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, संतोष राणे, ध्वजा उचले, रवी महाडेश्वर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली. कणकवली शहरातील बाजारपेठेमध्ये केलेल्या या कारवाईने काही ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांसोबत खटके देखील उडाल्याचे समजते. मात्र बाजारपेठेतील रस्त्यावर अतिक्रमण केलेले आढळल्यास कारवाई केली जाणार. असल्याचा इशारा नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिला आहे. दरम्यान ही कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमधून मात्र याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली