युवतीचे अश्लील फोटो पसरवण्याची भीती दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला सशर्थ जामीन मंजुर

आरोपीच्या वतीने अँड. अक्षय चिंदरकर यांचां युक्तिवाद

देवगड तालुक्यातील एका युवतीला तिचे अश्लील फोटो पसरवण्याची भीती दाखवून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रघुनाथ वसंत कदम , पियाळी , तालुका कणकवली मूळ राह. कोल्हापूर याला सिंधुदुर्ग ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 व्ही. एस. देशमुख यांनी सशर्थ जामीन मंजुर केला. आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
नोव्हेंबर २०२३ मधे आरोपीने फिर्यादी युवतीला तिच्याशी मैत्री करून तिचे अश्लील फोटो पसरवण्याची भीती दाखवून कणकवली येथे आणून तसेच त्यानंतर सन २०२३ ते २०२४ या कालावधीत कणकवली व वागदे येथील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन जबरदस्ती वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबाबत फिर्यादीने दिनांक १४/१२/२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 64(1),64(2)(m),75(1)(i),75(1)(i),78,352,351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. आरोपीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन त्याला पन्नास हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला साक्षीदारांवर दबाव आणू नये, सरकार पक्षाच्या पुराव्यात अडथळा करू नये, इतर गुन्हा करू नये आदी अटी घातल्या आहेत.

error: Content is protected !!