पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते श्री देव रुजेश्वर उद्यान लोरे चे 27 जानेवारी रोजी होणार लोकार्पण

लोरे नं 1 ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून 1 एकर क्षेत्रात उभारण्यात आलंय अभिनव उद्यान

अध्यात्म, पर्यटन, शरीरसौष्ठव च्या त्रिवेणी संगमातून मनःशांती देणारे एकमेव उद्यान

खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यामुळे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या ग्रामीण भागातील पर्यटन व अध्यात्म ला बळकटी देणाऱ्या प्रेरणेतून आणि नाविन्य निर्मिती विकास कामांच्या माध्यमातून. ग्रामपंचायत लोरे नं 1 आणि लोकसहभागातून साकार झालेल्या श्री देव रुजेश्वर उद्यान चा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी ६. वाजता नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. स्मार्ट व्हिलेज लोरे मध्ये, ग्रामीण भागातील पहिले रुजेश्वर उद्यान तब्बल १ एकर विस्तृत क्षेत्रात उभारण्यात आले असून, त्यामध्ये विविध नाविण्यपूर्ण प्रकारची फुलझाडे, प्राचीन आयुर्वेदिक वृक्ष, विविध अध्यात्मिक स्टॅटयू, वॉकिंग आणि जॉगिंग ट्रॅक, तसेच लहान मुलांसाठी खेळाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांसाठी योगा सेंटर, ओपन जिम, पाण्याचे कृत्रिम कारंजे, बॅडमिंटन कोर्ट आणि निसर्गसंपन्न झोन उभारले गेले आहेत. लोरे ग्रामपंचायत आणि माजी सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे उद्यान सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाला साद घालणार पर्यटन स्थळ आहे. कृषिउत्पन्न बाजार समिती सभापती श्री. तुळशीदास राणे यांचे विशेष मार्गदर्शन आणि लोरे गावातील ग्रामस्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उद्यान निर्मितीसाठी लाभला आहे. त्यांच्या प्रयत्नाचे,श्रमाचे, दातृत्वाचे प्रतीक यातून साकारले आहे. ग्रामपंचायत आणि लोकसभागातील हे उद्यान गावच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. या कार्यक्रमानंतर पहिल्यांदाच लोरे पंचक्रोशी महोत्सव २०२५ चे आयोजन केले आहे. यामध्ये सूर नवा ध्यास नवा फेम गायक अनुष्का शिकतोडे, संगीत सम्राट रविंद्र खोमणे, पार्श्वगायिका कविता राम यांची बेधुंद संगीत सांस्कृतिक कार्यक्रमाची विशेष मेजवानी रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊन ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपस्थित राहवे असे आवाहन सरपंच अजय रावराणे आणि ग्रामपंचायत प्रशासन लोरे ने केले आहे.

error: Content is protected !!