बेकायदेशीर मटका, जुगार, दारू धंदे बंद झालेच पाहिजेत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना

विकास प्रकल्पना विरोध करणाऱ्या ब्लॅकमेलर यांवर कारवाई करा

सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार नाहीत. हा जिल्हा ड्रग मुक्त व्हावा यासाठी पोलीस बळाने आपली ताकद दाखवावी. बेकायदा दारु, मटका व जुगार बंदच झाले पाहिजेत. अनैतिक धंदे या जिल्ह्यात नकोच यासाठी जिल्हा पोलिस दलाने कडक भूमिका घ्यावी व अशा विरोधत करवाई करावी असे आदेश पालकमंत्री या नात्याने पोलिस अधिकाऱ्यांना दिले.
देशाची सागरी सुरक्षा म्हत्वाची आहे. आपल्या जिल्ह्याला सन २०१४ मिळालेल्या ९ बोटी कालबाह्य झाल्या आहेत. १० अद्ययावत स्पीड (स्टील) बोटी द्याव्यात अशी चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झाली आहे. निवासस्थान दुरुस्ती म्हत्वाची आहे. वाहन व्यवस्थेसाठीही निधीही उपलब्ध करुन दिला जाईल.
सिंधुदुर्ग जिल्हात अनेक विकासाचे प्रकल्प सुरु आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दावोस ला जाऊन आलेत. काही गुंतवणूकदार या जिल्ह्यात गुंतवणूक करायला तयार आहेत. काही राजकीय मंडळी अशा उद्योजकांना विरोध करून त्रास देऊन, ब्लॅकमेल करतात हे प्रकार तातडीने थांबायला हवेत. जिल्हा पोलीस दलाने अशा प्रकल्पांना भेटी देऊन अशा ब्लॅकमेलर वर कडक करवाई करा असे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी अनिल पाटील, सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से) पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग, कृषिकेश रावले (भा.पो.से) अपर पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!