शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आणि त्यांचे कार्य आज सर्वांसाठीच प्रेरणादायी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे प्रतिपादन
युवासेना -शिवसेना कलमठ आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हिंदुत्वाची ज्वाला पेटवली .अखंड हिंदुस्थानचे ते लाडके वक्ते होते.त्यांचे ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार आणि त्यांचे कार्य आज सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे.त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे.असे प्रतिपादन युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.
ते कलमठ विठ्ठल मंदिर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवा सेना आयोजित जिल्हास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी माजी आमदार परशुराम उर्फ जी.जी.उपरकर ,कन्हैया पारकर तालुका प्रमुख,सचिन सावंत, महिला तालुका प्रमुख वैदेही गुडेकर,विलास गुडेकर, किरण हुन्नरे, तेजस राणे, जितू कांबळी उप-तालुकाप्रमुख, अनुप वारंग विभाग प्रमुख, धनश्री मेस्त्री विभाग प्रमुख, धीरज मेस्त्री शहरप्रमुख, कलमठ, हेलन कांबळी ग्रामपंचायत सदस्य, विठ्ठल कोरगावकर, बाबू कोरगावकर, आशिष कांबळी,आशिष मेस्त्री, प्रसाद मठकर,आदित्य पालव, तन्मय सावंत.कलाकार सदा आमडोसकर, आबा तेली ,शशिकांत (टिकू) कांबळी, अनंत पालकर, प्रथमेश मठकर, उत्तर वर्देकर ,प्रभाकर चिंदरकर, नाना नांदगावकर, विजय गोठणकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सुशांत नाईक म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने संपन्न होत आहे. सामाजिक उपक्रमांनी कार्यक्रम साजरा होत असताना त्यातून समाजाला मार्गदर्शन मिळावे.हा उद्देश आहे. जिल्ह्यातील रांगोळी कलाकारांना रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे, त्यातून चांगले कलाकार घडावेत.आणि बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि त्यांचे कार्य नव्या पिढीला अभिप्रेत व्हावे.यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले.या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे भावचित्र साकारावे यासाठीच भव्य जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.असेही नाईक यांनी सांगितले.या सर्व कलाकारांना नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.
कलमठ विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आम्ही कौतुक करतो.असे नाईक यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले की,शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला समाजसेवेचे बाळकडू दिले.८०% समाजकारण २०% राजकारण हि शिकवण दिली.समाजकारणातून लोकांची सेवा, लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडचणी या सोडवत राहण्यासाठीच शिवसेना लढली.सत्तेसाठी शिवसेना कधीच लढली नाही ,सत्ता असावी सोबत म्हणून शिवसेना लढत आली. शिवसेना ही संघटना सातत्याने लोकांच्या असलेल्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन लोकांना मदत करण्यासाठी पुढे आली.जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याकरीता प्रयत्न केले.
कलमठ युवा सेनेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करुन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि आठवणींना उजाळा देताना रांगोळीतुन चित्र रेखाटत रांगोळी कलाकारांनी अनोखे अभिवादन केले आहे.त्यांच्या या कलागुणांचे आपण कोतुक करतो.असे गौरवोद्गार उपरकर यांनी काढले.
मी एक शिवसैनिक म्हणून तुमच्या सोबत असेल अशा प्रकारचे आपल्याला अभिवचन देतो.असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाभरातून आलेल्या रांगोळी कलाकारांनी रांगोळीतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे भावचित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले.
यावेळी रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक – समीर चांदरकर,
द्वितीय क्रमांक- केदार टेबकर
तृतीय क्रमांक – विजय मेस्त्री,
उत्तेजनार्थ – राम बिबवणेकर या
विजेत्यांना माजी आमदार परशुराम उपरकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आणि मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणापत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कलमठ गावातील जेष्ठ कलाकार सदा आमडोसकर, आबा तेली ,शशिकांत (टिकू) कांबळी, अनंत पालकर, प्रथमेश मठकर, उत्तर वर्देकर ,प्रभाकर चिंदरकर, नाना नांदगावकर, विजय गोठणकर
यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने शिवसेनिक, युवा सेनेचे पदाधिकारी,रांगोळी कलाकार, विद्यार्थी उपस्थित होते.