जानवली मारुती मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 26 जानेवारी रोजी

विद्यार्थ्यांचा स्त्री शक्ती महान हा नाट्यप्रयोग ठरणार लक्षवेधी

कणकवली तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा मारुती मंदिर वाकाडवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन 26 जानेवारी रोजी शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जानवलीचे सरपंच अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचे अशोक नारकर, जानवली उपसरपंच किशोर राणे, पोलीस पाटील मोहन सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, केंद्रप्रमुख काळू पवार, माजी जि प उपाध्यक्ष रंजन राणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री 8 वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व ग्रुप डान्स होणार आहेत. त्यानंतर रात्री 10 वाजता रवींद्र पांचाळ दिग्दर्शित, व शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक केंद्र शाळा मारुती मंदिर निर्मित स्त्री शक्ती महान हे दशावतारी नाटक होणार आहे. या नाट्य निमित्ताने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये त्याची उत्सुकता वाढवणारा तयार केलेला टीझर हा देखील लक्षवेधी ठरला आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक शंकर बागवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण राणे, पालक शिक्षक माता संघ अध्यक्ष दिशा राणे, सांस्कृतिक मंत्री वेदिका कदम,रसिका लाड व शालेय मुख्यमंत्री वेदांत पाटील आदींनी केले आहे.

error: Content is protected !!