दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर कणकवलीत पुन्हा आजपासून मटका सुरू

पालकमंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्या नंतर दोन दिवस मटका ठेवण्यात आला होता बंद

कणकवली पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत पालक मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत वक्तव्य केल्यानंतर कणकवलीतील मटका गेले दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. कणकवली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर खुलेआम मटका सुरू असताना या मटक्यावर कारवाई होत नव्हती. मात्र आता पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील त्या इशाऱ्यानंतर अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील मटका दोन दिवस बंद ठेवत याबाबत मटका व्यावसायिकांकडून घाबरल्यासारखी स्थिती निर्माण करण्यात आली. परंतु आज शुक्रवार पासून पुन्हा मटका कल्याण सुरू झाला असून, कणकवली पोलीस आता याप्रकरणी काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!