विवाहितेवर अत्याचार प्रकरणी आरोपी निर्दोष

संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणीच्या आरोपातून तालुक्यातील बिडवाडी येथील बाबाजी तुकाराम मुळये याची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
कामाच्या निमित्ताने विवाहितेशी ओळख बाढवून, मैत्री करून, प्रसंगी तीला आर्थिक मदत करून मैत्रीचा गैरफायदा घेत मार्च २०२० च्यामध्ये विवाहिता कामावरून घरी परतत असताना तीचा पाठलाग करून निर्जनस्थळी तीला थांबवून जंगलमय भागात ओढत नेऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तीचे फोटो काढून ते प्रसारीत करण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीवर भादवि कलम ३७६ (१अ) व ३४१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, वैद्यकीय पुराव्यातील विसंगती यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!