कणकवलीतील लक्ष्मी लॉज चा मालक संजय सांडव याला अटक

बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय प्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी

“त्या” दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडी

कणकवलीत बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी अखेर त्या लॉज मालकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. तर अनधिकृत रित्या वास्तव्याबद्दल पोलीस कोठडीत असलेल्या साथी अतुल माझी व लिझा शेख त्या दोन बांगलादेशी महिलांची पोलीस कोठडी आज गुरुवारी संपली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत परवानगी केली. तर या प्रकरणात लॉज मालक संजय सुरेश सांडव (कणकवली तेली आळी) याला पोलिसांनी अटक केली असून, लक्ष्मी लॉज च्या या मालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले दोन दिवस लक्ष्मी लॉज चा मालक अटक केव्हा होणार असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात होता. दरम्यान या प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील पोलिसांना आपली स्टाईल दाखवल्यानंतर या प्रकरणातील बंद दरवाजाआड होणाऱ्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान लॉज मालकाला अटक झाल्याने आता गुन्ह्याचा पुढील तपास होणे अधिक सोपे होणार आहे. दरम्यान संजय सांडव याला काल रात्री अटक केल्यानंतर त्याला आज कणकवली पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला 25 जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील लॉज चां मॅनेजर ओमकार विजय भावे (32 कळसुली) याला यापूर्वी अटक करण्यात आली असून या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला संजय सांडव हा पोलिसांच्या अटकेत आल्याने आता पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!