कणकवलीचे सुरेश बिले मुंबईत चालले

कणकवली(प्रतिनिधी) कणकवलीचे कवी, एस.टी महामंडळाचे निवृत्त अधिकारी सुरेश बिले याना चालण्याच्या स्पर्धेत मुंबईत ताम्र पदक मिळाले आहे. दिनांक १९ जानेवारी रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन चे भव्यदिव्य आयोजन मुंबईत करण्यात आले होते. संपूर्ण मुंबई शहर तसेच ठाणे जिल्हा व नवी मुंबई येथून हजारो स्पर्धक ह्या स्पर्धेत सहभागी झाले होते. जेष्ठ नागरिक, दिव्यांगजन, महिला व तरुणवर्ग अशा गटात हि स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत कणकवली शहरातील साठ वर्षांवरील उत्साही तरुण श्री. सुरेश बिले यांनी जेष्ठ नागरिक गटात सहभाग घेऊन १६९२६ पाऊले चालून ताम्रपदक मिळविले आहे. सर्व स्तरातून श्री. सुरेश बिले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





