मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची खारेपाटण येथे सदिच्छा भेट

खारेपाटण केंद्र शाळा, खारेपाटण ग्रामपंचायत, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जलजीवन मिशन कामाची प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी आज बुधवारी दि.१५/१/२०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजता वाजता कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावाला अचानक भेट दिली.या भेटी दरम्यान त्यांनी जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला तसेच ग्रामपंचायत कार्यलय खारेपाटण व अंगणवाडी केंद्र व प्रा.आ.केंद्र खारेपाटण आदी प्रशासकीय कार्यालयांना सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.व काही सूचना संबधीत कर्मचारी वर्गाला केल्या.
यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन श्री किशोर काळे, कणकवली पं.स. गटविकास अधिकारी श्री अरुण चव्हाण, सहायक गट विकास अधिकारी मंगेश वालावलकर,तसेच खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव,श्री संतोष पाटणकर यांसह पाणी पुरवठा विभागाचे डेपोडी इंजिनियर श्री घेवडे,बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री महाले,पं.स.विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, समाजकल्याण विभग पं.स चे श्री बेहरे,पं.स.पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता श्री गुरसाळे,अमित सामंत खारेपाटण ग्रामविकास अधिकारी श्री आर जी वेंगुर्लेकर आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
खरेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ या शाळेचे मुख्यद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी मुख्य कार्यकारी श्री देशमुख यांचे पुष्प गुच्छ देऊन शाळेत स्वागत केले.यावेळी संपूर्ण शाळेची पाहणी करून काही वर्गावर देखील विद्यार्थ्यांना शिक्षण व अभ्यासक्रम संदर्भात प्रश्न विचारून शाळेचा पाठ घेतला.एकूण शाळेच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले. तर खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांनी श्री देशमुख साहेब यांचे स्वागत करून प्रशासकिय विकास कामाबाबत चर्चा केली. दरम्यान खारेपाटण टाकेवाडी येथील जलजीवन मिशन कामाची देखील त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केली.
याबरोबरच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी भेट देऊन मेडीसिन स्टॉक ची पाहणी केली. यावेळी खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांनी आरोग्य विषयक सोयी सुविधां विषयी माहिती दिली. तर खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथील अंगणवाडी केंद्राला देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली.अंगणवाडी सेविका श्रीमती मोहिरे यांनी बालकांच्या पोषण आहार एकात्मिक बाल विकास यांच्या मार्फत बालकांना असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली.
खारेपाटण येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील शाळा, ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाने आपले काम चांगले करत रहा.शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवा.शासनाची विविध बक्षिसे मिळवा. व खारेपाटण गावाबरोबरच आपल्या डिपार्टमेंटसह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा. प्रशासन तुमच्या नेहमी पाठीशी राहील.असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मकरंद देशमुख यांनी यावेळी कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थांना सांगितले.

error: Content is protected !!