विद्यार्थ्यांनी घेतला आकाश दर्शनाचा अनोखा अनुभव

आचरा हायस्कूल येथे सेवा साधना प्रतिष्ठ केतकी चा उपक्रम
आचरा हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळच्या वेळी टेलिस्कोपच्या सहाय्याने आकाशातील ग्रहगोल,तारे, आकाशगंगांचे निरीक्षण करत मुलांनी घेतला आकाश दर्शनाचा अनुभव.चिपळूण येथील सेवा साधना प्रतिष्ठान तर्फे सामाजिक भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत अवांतर ज्ञान मिळावे या उद्देशाने सेवासाधना प्रतिष्ठान चिपळूण कार्यरत आहे. आचरा येथे
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा व कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेत सेवा साधना प्रतिष्ठान केतकी चिपळूण मार्फत पर्यावरण, विज्ञान, इतिहास, योग, आकाशदर्शन इत्यादी विषयांबाबत तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेत विज्ञान गाथा अद्भुत प्रवास, सह्याद्री पर्वतरांगा, माहितीपट, आहार ऑइल पॉल्युशन ,जीवसृष्टीची उत्क्रांती, अंधश्रद्धा खडक व जीवाश्म प्रदर्शन तसेच आकाशदर्शन याबाबत
सेवा साधना प्रतिष्ठान केतकी चिपळूण या संस्थेचे संस्थापक नागेश नांगी सेक्रेटरी विनीत वाघे ,सौ लिना नांगी, श्रुती घाग, शुभम लिबे यांनी
विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
मुंबई समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांच्या प्रेरणेने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसोबत शालेय शिक्षण समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर, मुख्याध्यापक गोपाळ परब उपमुख्याध्यापक घुटुकडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.