आयनल देवस्थानचा देवदीपावली उत्सव करण्यास पार्टी नंबर १ परवानगी

पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

आयनल गावामध्ये दि. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या श्री नागेश्वर पावणाईचा देवदिपावली जत्रौत्सव साजरा करण्यास पार्टी नं.१ चे सुर्यकांत साटम वगैरे पाच यांना कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. हा जत्रोत्सव साजरा करताना शांतताभंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पार्टी नं. १ मधील प्रविण साटम व पार्टी नं. २ मधील गजानन साटम वगैरे यांना सहभागी होण्यास हरकत नसल्याचेही आदेश दिले आहेत. पार्टी नं. १ च्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
आयनल येथे पार्टी नं. १ व पार्टी नं २ यांचेत सदर देवदिपावली जत्रोत्सव साजरा करण्याबाबत एकमत झालेले नसून दोन्ही पार्ट्या आपल्या मतांवर ठाम आहेत. तसेच पार्टी नं. १ मधील प्रविण जगन्नाथ साटम यांनी त्यांचे पार्टी नं.१ चे विरोधात म्हणणे सादर केलेले आहे. यावरून सदर उत्सवावेळी वादविवाद होऊन शांतता भंग होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस निरिक्षक यांनी दोन्ही पार्टीना सदर उत्सव साजरा करण्यास भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे बंदी आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली होती.
याप्रकरणी कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली. यात पार्टी क्र.१ च्या वतीने अॅड. उमेश सावंत यानी वकीलपत्र दाखल करुन तोंडी युक्तीवाद केला. वार्षिक जत्रोत्सव पारंपारीक पद्धतीने आयनल गावामध्ये पार पाडण्यासाठी पार्टी न.१ यानी दरवर्षी प्रमाणे तयारी दर्शवीली आहे. जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग यांनी पार्टी नं १ चे बाजुने RCA NO १०२/२०११ मध्ये दि. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला निर्णय स्वयंस्पष्ट आहे. सदर आदेश पारित झाल्यानंतर देवदिपावली साजरी करणेत आलेले होते, सकारात्मक दृष्टीकोनातून पार्टी क्र.१ चे बाजुने निर्णय देण्यात यावा. मात्र उत्सवामध्ये पार्टी नं २ मधिल मानकऱ्यांनी सामिल होण्यास हरकत नाही असे म्हणने मांडले. पार्टी नं.१ मधील प्रविण जगन्नाथ साटम यांनी दोन्ही पार्टी यांना कोणताही उत्सव साजरा करण्यास परवानगी न देणेबाबत लेखी म्हणणे सादर केले आहे.

पार्टी नं २ यांनी लेखी जबाब पोलिसांकडे दाखल केला आहे. यात संभाजी साटम व १९९८ पासुन २००५ पर्यंत दावा चालवला. त्यामध्ये Counter claim देखील केला होता. कणकवली कोर्टात पार्टी नं.२ चे बाजुने निकाल देण्यात आला होता. त्याविरुद्ध गंगाराम अनंतराव साटम यांनी जिल्हा न्यायालयात २०११ मध्ये अपील दाखल केले होते. त्याचा निर्णय पुनर्वादीचे बाजुने देण्यात आला आहे. सदर निर्णया विरुद्ध पार्टी क्र. २ ने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्याचा निर्णय प्रलंबित आहे, अशा परिस्थितीत पार्टी क्र. २ ला देवदिपावली जत्रोत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, असे म्हटलेले आहे.
दोन्ही गटांचे युक्तीवाद तसेच यापूर्वी या कार्यालयाकडून सदर प्रकरणी वेळोवेळी पारित झालेले आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग यांचेकडील रिव्हीजन अॅपलीकेशन क्रमांक ३०/२०२३ चे अवलोकन करता आयनल येथील देवदिपावली जत्रोत्सवास कलम १६३ अन्वये बंदी घालणे करिता पुरेशे सबळ कारण दिसून येत नाही. त्यामुळे पार्टी नं. १ ला उत्सव साजर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!