प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार किरण हणमशेठ यांचे पाट हायस्कूलच्या मुलांसाठी मार्गदर्शन
निलेश जोशी । कुडाळ : ज्यांनी जे आर डी टाटा, शरदराव पवार तसेच मोठमोठे उद्योगपती यांचे व्यक्ती चित्रण केले आहे, असे सुप्रसिध्द चित्रकार किरण हणमशेठ यांनी पाट हायस्कुलला भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. विविध विषयाचे मार्गदर्शक बोलावले जातात. कुडाळ येथे रजनीकांत कदम ( चित्रकार) यांच्या गणेश स्वामी आर्ट कला केद्राचे उद्घाटन होते. त्याकरिता प्रसिद्ध चित्रकार किरण हणमशेठ, चित्रकार अनिल कुबल, चित्रकार निंबाळकर कोल्हापूर, चित्रमहर्षी के बी कुलकर्णी यांचे ट्रस्ट अध्यक्ष जयवंत नाईक ( चौ) तसेच शिरीष कुलकर्णी कुलकर्णी सरांचे नातू यांनी या कार्यशाळेनंतर पाट हायस्कूलला भेट दिली.
यावेळी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या मुलानी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. स्मरण चित्र रेखाटन या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रेड परीक्षेसाठी कमीत कमी वेळेत चित्रण कसे रेखाटता येईल, चित्राचे प्रमाणबद्धता चित्रातील रंगसंगती या विषयाचे छान मार्गदर्शन केले. यावेळी अनिल कुबल यांनीही ग्रेड परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. यापूर्वी कलाविषयक पुस्तके जयवंत नाईक यांनी विद्यालयाला भेट दिली होती. या सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी केले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी गुरुनाथ केरकर सर, कला शिक्षक संदीप साळस्कर सर, सौ सिद्धी चव्हाण मॅडम उपस्थित होत्या. यावेळी कला विषयक चित्रफित दाखविण्यात आली . शाळेत घेतले जाणारे विविध कलाविषयक उपक्रमाची मान्यवरांनी माहिती करून व सर्व उपक्रमांचे कौतुक केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.