चिंदर गावात महायुतीचे उमेदवार निलेश राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ
श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेऊन घरोघरी प्रचाराला सुरुवात
आचरा
कुडाळ मालवण मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या चिंदर येथील प्रचाराचा शुभारंभ श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. यावेळी श्री देव रामेश्वरला निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे साकडे घालण्यात आले. तसेच घरोघरी प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष कोदे, संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री, दत्तात्रय लाड, देवेंद्र हडकर, मंगेश गांवकर, अमोल माळगांवकर, भाऊ हडकर, मनोज हडकर, हिमाली अमरे, अजित साटम, दिपक सावंत, अरविंद घाडी, चंद्रशेखर पालकर, विनोद लब्दे, प्रिया पालकर, सुबोध गांवकर, ग्रेगुरी फर्नांडीस, संदिप सावंत, अमोल घागरे, निखिल माळगांवकर, राजाराम केळसकर, देवेंद्र हडकर, संजय लोके, दत्ता वराडकर, आबा लब्दे, श्री कावले, हर्ष आडवलीकर, विजय माळगांवकर, नितीन पाताडे आदी उपस्थित होते.