नितेश राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 16 नोव्हेंबरला कणकवलीत जाहीर सभा

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती

कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १६ नोव्हेंबर रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. १६ रोजी दुपारी १ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पटांगणावर ही सभा होणार असून यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.

यावेळी आमदार नितेश राणे, भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद ताबडे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांचे दौरे नुकतेच या मतदारसंघात झाले. या दौऱ्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. या मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही सभा महत्त्वपूर्ण असणार असल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले.

error: Content is protected !!