आमदर नितेश राणेंसाठी त्यांच्या मातोश्री निलम राणे मैदानात

आर्थिक समृद्धी व हाताला काम हेच आ. नितेश राणे यांचे ध्येय

निलम राणे यांचे देवगड येथील महिला मेळाव्यात प्रतिपादन

पडेल कॅटींग येथील महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

नारायण राणे यांच्या जिल्ह्य़ातील विकासकामांचा धडाका नितेश राणे यांनी सातत्यपूर्ण चालू ठेवला असून आर्थिक समृद्धी आणि दोन हातांना काम हे एकच ध्येय्य त्यांनी समोर ठेवलं आहे.त्यामुळे विरोधकांकडून टिका करुन काहीच साध्य होणार नाही असा विश्वास निलम राणे यांनी पडेल कॅटींग येथे व्यक्त केला. त्या पूढे म्हणाल्या की, महिलांची एवढी उच्चांकी गर्दी पाहून समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार हे निश्चित झाले आहे. पडेल कॅटींग येथे भाजप पडेल मंडल विभागाचा महिला मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थित महिलांना त्यांनी मार्गदर्शन केलं.
यावेळी व्यासपीठावर भाजप महिला जिल्हा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, उपाध्यक्षा प्रियांका साळस्कर, माजी जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, अस्मिता बांदेकर, शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, पडेल अध्यक्षा संजना आळवे, देवगडच्या नगरसेविका तन्वी चांदोस्कर, माजी जि. प. सदस्या सावी लोके, अनघा राणे, माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम, पुर्वा तावडे, उल्का जोशी, शिवसेना शिंदे गटाच्या देवगड तालुका महिला अध्यक्षा नीता गुरव उपस्थित होत्या. यावेळी जिल्ह्य़ातील भाजप महिला पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या कारकिर्दीतील विकासकामांचा आढावा, महाविकास आघाडीच्या सत्ता काळातील निष्क्रीयता, युतीच्या विविध लोकप्रिय योजना आदींबाबत भाष्य केले. महिलांच्या अभूतपूर्व गर्दीतून आमदार नितेश राणे यांना पडेल, पुरळ फणसगाव पंचक्रोशीत फार मोठे मताधिक्य मिळेल, पर्यायाने नितेश राणे आमदारकीची हॅटट्रिक साधतील हे निश्चित झाले आहे.

error: Content is protected !!