उद्धव ठाकरे यांनी आपल्या हट्टा पायी शिवसेना पक्ष संपविला
काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने शिवसेनेतील चाळीस आमदार फुटले
गद्दार कोण हे सगळ्यांना माहित आहे मंत्री दीपक केसरकर यांची जोरदार टीका
शालेय शिक्षण मंत्रीदीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप
आमदार-खासदारांपेक्षा गांधी आणि पवार जवळचे वाटल्यामुळेच उद्धव ठाकरेंची “अधोगती”
तुम्ही महाराष्ट्रात पुन्हा डोकं वर काढणार नाही
लोकसभा मतदार संघात शिवसेना पक्ष मजबूत करणार
आमदार संपर्क प्रमुख रविंद्र फाटक
सावंतवाडी : आम्हाला हे गद्दार म्हणत आहेत. पण खरे गद्दार हे आहेत. कारण यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाच्या बाजून उभे राहिलो आहोत. खोक्याचा अर्थ काय ? आम्ही काय पैसे घेवून कुठे गेलोय. अहो यांना पाहिजे त्यावेळी पैसे आम्ही पुरविले आहे. मंत्री पदाच्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सगळा खर्च मी माझ्या प्रॉपर्टी विकून केलेला आहे. मग यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे ? असा जोरदार प्रहार शिवसेना प्रवक्ते तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. जर पुन्हा पुन्हा गद्दार हा शब्द वापरत राहिले तर त्यांचे सर्व कुंडली बाहेर काढणार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी इशारा दिला. जर त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेतले असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसते हा देशात नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान लाभले आहेत तसेच अमित शहा सारखे व मंत्री लाभले आहेत आज भाजप पक्षाबरोबर राहिले असते तर राज्याचा सर्वांगीण विकास झालेला असता मात्र तसे न करता ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले त्यामुळे त्यांचा शिवसेना पक्ष संपुष्टात आला आहे.
आम्ही कोणीही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितला नव्हता. त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडावी हीच आमची मागणी होती. मात्र आमदार-खासदारांपेक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार जवळचे वाटल्यामुळेच त्यांची ही अधोगती झाली, असा टोला शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला. दरम्यान मी स्वतःची “प्रॉपर्टी” विकून सिंधुदुर्गात शिवसेना वाढवली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा खोक्यांचे आरोप करताना विचार करावा
शिवसेना पक्ष यांचा प्रथमच मेळावा सावंतवाडी या ठिकाणी आयोजित केला होता यावेळी अनेक कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यापीठावर मंत्री दीपक केसरकर, आमदार रविद्र फाटक, कर्नल सुधीर सावंत,अशोक दळवी तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मोठ्यप्रमाणात शिवसेना कार्यकर्ते उपसथित होतें.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सावंतवाडी