सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या मतमोजणी मध्ये काटे की टक्कर
तासाभरात ठरणार जिल्हा बारासोसिएशनचा अध्यक्ष व कार्यकारिणी
वकील वर्तुळात निकालाकडे सर्वांचे लक्ष
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन च्या अध्यक्ष व कार्यकारणी करिता झालेल्या निवडणुकीत एकूण तीन पॅनल आमने-सामने होती. यामध्ये कणकवलीतून अध्यक्षपदासाठी ऍड. उमेश सावंत व उर्वरित कार्यकारीणी पॅनल तर सावंतवाडी मधून ऍड. परिमल नाईक व त्यांच्या सोबतच्या कार्यकारणीचे पॅनल तर कुडाळमधून ऍड. राजीव बिले व त्यांच्या ककार्यकारिणी चे पॅनल असे आमने-सामने उभे ठाकले होते. ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित असतानाच एकूण 600 हुन अधिक मतदान झालेले असताना या निवडणुकीत कोण बाजी मारणार? जिल्हा बार असोसिएशनचा अध्यक्ष कोण होणार? याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सायंकाळपासून या निवडणुकीकरिता मतमोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत चार राऊंड पूर्ण झाले आहेत. तर पाचव्या राऊंड ची मतमोजणी सुरू आहे. एकूण १३ राऊंडमध्ये मतमोजणी होणार असून, ऍड. उमेश सावंत व ऍड. परिमल नाईक यांच्यामध्ये काटे की टक्कर सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र अद्याप आठ राउंड बाकी असल्याने अंतिम फेरीपर्यंत मतदानाचा निकाल ताणला जाण्याची शक्यता आहे.
दिगंबर वालावलकर / कपकं नाऊ / सिंधुदुर्ग