आचरा हायस्कूलचे माजी क्रीडाशिक्षक रमेश गोवेकर यांचे निधन
आचरा प्रतिनिधी
आचरा -समर्थ नगर येथील राहिवासी आचरा हायस्कूलचे माजी क्रीडाशिक्षक रमेश घनश्याम गोवेकर वय 84 वर्षे यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धपकाळाने दुःखत निधन झाले. राज्य स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत त्यांनी अनेक विद्यार्थी चमकवले होते. कडक शिस्तीचे पण तितकेच प्रेमळ सदैव उत्साही, नेहमी हसतमुख व कार्यशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. विध्यार्थी वर्गाला नेहमीच हवे हवेसे वाटणारे शिक्षक अशी त्यांची ओळख होती.
1962 साली ते आचरा हायस्कूल मध्ये क्रीडाशिक्षक म्हणून रुजू झालेत. ते खेळा बरोबर भूगोल, कार्यानुभव असे विषय शिकवत. हॉलि्बॉल, क्रिकेट, कबड्डी, खोखो,असे मैदानी खेळात विद्यार्थी घडवून जिल्हा राज्य स्तरावर चमकवले होते. 1999 साली ते आचरा हायस्कूल मधून नियत वयोमानानुसार ते निवृत्त झाले होते.
त्यांचा पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. .महावितरणचे शासकीय ठेकेदार गणेश गोवेकर, आचरा बाजारपेठ येथील ट्रेलर हेमंत गोवेकर यांचे ते वडील होतं.