पालकांनी मुलांवर सीसीटीव्ही बनून लक्ष ठेवा–सुदेश तांबे
आचरा– अर्जुन बापर्डेकर
बदलत्या परीस्थिती नुसार मुलांसमोर अनेक संकटे ,आव्हाने सामोरी येत आहेत. यासाठी पालकांनी सजग होवून मुलांच्या दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बनून काम करा असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुदेश तांबे यांनी आचरा हायस्कूल येथे केले.
शाळेच्या मुलांवर वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांबाबत पालकांनी कोणती सावधगिरी बाळगावी या बाबत तांबे मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत,सदस्य राजन पांगे,बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे,मधुरा माणगांवकर,दत्तात्रय जाधव आदींसह बहुसंख्येने पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना तांबे यांनी मोबाईल मुळे गुन्ह्यात वाढ होत आहे. वाईट गोष्टीसाठी मोबाईलचा वापर होत आहे. यासाठी पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर बंधने आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परब यांनी केले तर आभार दत्तात्रय जाधव यांनी मानले.