मालडी गावात श्री भावई देवी नवरात्र उत्सवाला सुरुवात

मालवण तालुक्यातील मालडी गावात श्री भावई देवी नवरात्र उत्सवाचे आयोजन
मालवण तालुक्यातील मालडी गावची ग्रामदेवता आणि अर्ध्या केळ्याच्या नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भावई देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त गावात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्र उत्सवाच्या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता सुस्वर भजनाचे आयोजन करण्यात येणार आहे. भजनानंतर देवीची आरती व प्रसादाचे वाटप होईल. तसेच रात्री गरबा नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या धार्मिक उत्सवात भाविकांनी, ग्रामस्थांनी, मित्रमंडळींनी आणि नातेवाइकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री भावई देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मालडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.






